आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून कराड नगरपालिकेला दोन दिवसांत मिळणार नविन रूग्णवाहिका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून येणाऱ्या दोन दिवसांत नवीन रूग्णवाहिका कराड नगरपालिकेत उपलब्ध होणार आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी कराड नगरपालिकेकडे निधी वर्ग केला आहे, अखेर आज त्यासंबधी काॅंग्रेसच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले असते. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी येत्या दोन दिवसांत रूग्णवाहिका घेतील जाणार असल्याचे सांगितले.

कराड नगरपालिकेमध्ये कराड शहर काँग्रेस कमिटीतर्फे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या वर्षी नवीन रूग्णवाहिका घेण्यासाठी दिलेला निधी त्वरित चेक देण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, कराड शहर उपाध्यक्ष भास्करराव देवकर आदी उपस्थित होते.

सध्याच्या कोरोनाच्या वाढता संसर्ग पाहता नगरपालिकेची रूग्णवाहिका असणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी निधी उपलब्ध करूनही केवळ राजकीय हेव्यादाव्यामुळे घेण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर आज कराडच्या काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकांऱ्यांनी रूग्णवाहिकेचा चेक देवून त्वरीत घेण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी येणाऱ्या दोनच दिवसांत रूग्णवाहिका घेतली जाईल असे सांगतिले.

You might also like