भाजपमध्ये या, ED- CBI केसेस बंद करू; सिसोदिया यांच्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सीबीआयच्या रडारावर असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये सामील व्हा त्यानंतर सीबीआय आणि ईडीच्या धाडी बंद होतील अशी ऑफर आली असल्याचे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत म्हंटल, मला भाजपचा संदेश मिळाला आहे – “आप’ तोडून भाजपमध्ये या, सीबीआय ईडीची सर्व प्रकरणे बंद केली जातील. पण भाजपला यावर माझं उत्तर हेच आहे की, मी राजपूत आहे, महाराणा प्रतापांचा वंशज आहे. मी माझे डोके कापून टाकीन, परंतु भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे करायचं ते करा.

त्यानंतर सीसोदीया यांनी आणखी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये ते म्हणतात भाजपाने मला मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवण्याची ऑफर दिली आहे. पण अरविंद केजरीवाल हे माझे राजकीय गुरू आहेत. मी कधीही त्यांचा विश्वासघात करणार नाही. मी मुख्यमंत्री बनण्यासाठी आलो नाही, माझे स्वप्न आहे – देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, तरच भारत एक नंबरचा देश होईल. संपूर्ण देशात हे काम फक्त केजरीवालजीच करू शकतात असेही त्यांनी म्हंटल.