कॉमेडियन विदुषीने उडवली वेश्याव्यवसायाची खिल्ली; सोशल मीडियावर संताप व्यक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या स्टँड-अप कॉमेडी करणे हा एक मनोरंजनाचा भाग बनला आहे. परंतु आता याचं स्टँड – अप कॉमेडीच्या माध्यमामधून वेश्याव्यवसायाची खिल्ली उडविण्याचा प्रकार घडला आहे. कॉमेडियन विदुषी स्वरूपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती उघडपणे देशात गंभीर मानल्या जाणाऱ्या  वेश्याव्यवसायावर खिल्ली उडवताना दिसत आहे. ज्यामुळे आज विदुषीला टीकांचा सामना करावा लागत आहे.

सोशल मीडियावर विदुषीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे की,” मला वेश्याव्यवसाय हा खूप मज्जेशीर व्यवसाय वाटतो. हा जगातील असा एकमेव व्यवसाय आहे. ज्यामध्ये अनुभवावरून पार्शलिटी करण्यात येत नाही. तिला फ्रेशर्स हवे असतात. ते ब्लॅकमध्ये “कच्ची कलिया” मागवत असतात. वेश्याव्यवसाय देशातील असा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये इंटनसुद्धा सीईओपेक्षा जास्त पैसे कमावत आहे”

 

 

विदुषीने वेश्याव्यवसायासारख्या गंभीर विषयावर असंवेदनशील टिपणी केल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल  करण्यात येत आहे. तिचा हा व्हिडीओ दिपीका नारायण भारद्वाज यांनी X वर शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर, “हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला लाज वाटते, असे बेताल अमानुष आणि घृणास्पद बोलणे एका स्त्रीला शोभणारे नाही” असे देखील म्हणले आहे. त्याचबरोबर, अनेकांनी विदुषीने या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, देशात स्टँड-अप कॉमेडीची क्रेझ वाढताना दिसत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात स्टँड-अप कॉमेडीचे शो आयोजित करण्यात येतात. अशा काही शोजच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील पोहचवले जातात. मात्र आता याचं शोच्या माध्यमातून नाजूक विषय देखील चेष्टेचा भाग समजून हाताळताना दिसत आहेत. ज्यामुळे लोकांपर्यंत वेगळा संदेश पोहचत आहे. सध्या विदुषीने केलेले हे वक्तव्य याचंच एक भाग मानला जात आहे.