हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रसिक प्रेक्षकांना हसवणारा आणि दुःखातही चेहरा हासरा ठेवणारा मराठी विनोदी अभिनेता भूषण कडू याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण जगभरात मृत्यूचे तांडव करणाऱ्या कोरोना महामारीने भूषणचा ही घात केला. भूषण ची पत्नी कादंबरी कडू हिला काही दिवसांपूर्वी कोरोना ची लागण झाली होती. दरम्यान तिच्यावर उपचारही सुरू होते मात्र अखेर ही लढत अयशस्वी झाली आणि कादंबरीने जगाचा निरोप घेतला. आजपर्यंत कादंबरीने प्रत्येक गोष्टीत भूषण ची साथ दिली होती. याबाबत नेहमीच भूषणने तीच्याप्रती कृतज्ञ ता दर्शविली होती. यामुळे तिच्या निधनाने आज भूषण ला त्याचा आधारस्तंभ हिरवल्याची खोल जाणीव होणे साहजिक आहे.
https://www.instagram.com/p/CPdro8Ilac_/?utm_medium=copy_link
भूषणची पत्नी कादंबरी कडू हिला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून तिची कोरोनासंग झुंज सुरू होती. तिला सुरुवातीला ठाण्याच्या एका हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र परिस्थिती पाहता डॉक्टरांनी तिला मुंबईतील केई एम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढील उपचारासाठी कादंबरीला के ई एम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच ठिकाणी तिने अखेरचा श्वास घेतला.
https://www.facebook.com/113608083713480/posts/308761640864789/
वयाच्या ३९ व्या वर्षी कादंबरीचे भरल्या संसारातून एकाकी जाणे भूषणसाठी अत्यंत वेदनादायी आहे. मराठी बिग बॉसच्या पर्वात जेव्हा भूषण सहभागी झाला होता, तेव्हा त्याची पत्नी कादंबरी आणि त्यांचा मुलगा प्रकिर्त याचे दर्शन प्रेक्षकांना झाले होते. भूषण बिग बॉसच्या घरात असताना कादंबरीने घराबाहेरील स्थिती एकाहाती संपूर्ण जबाबदारीनीशी सांभाळली होती. यांचा मुलगा प्रकिर्त केवळ ७ वर्षाचा आहे आणि त्याच्या डोक्यावरील आईचे छत्र कोरोनाने काढून घेतले आहे. यामुळे साहजिकच याविषयी माध्यामांसह बोलणे भूषण साठी अवघड आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भूषण आज निःशब्द झाला आहे. गीतकार चंद्रशेखर सांडवे यांनीही कादंबरीला श्रद्धांजली वाहिली आहे.
कादंबरीच्या निधनाचे वृत्त कळताच अभिनेत्री व बिग बॉस मराठी सीजन १ ची विजेती मेघा धाडे हिने शोक व्यक्त केला आहे. टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना मेघा म्हणाली की, कादंबरीच्या निधनाचा मला मोठा धक्का लागला आहे. बिग बॉसच्या घरात आमची पहिल्यांदा ओळख झाली होती. ती अत्यंत कणखर होती. तिचा आत्मविश्वास पाहून मी सुद्धा थक्क झाले होते. ती नेहमीच भूषणला पाठिंबा द्यायची. भूषण बिग बॉसच्या घरात असताना तिने बाहेरील परिस्थिती एकटीने लीलया सांभाळली होती. मी भूषण च्या दुःखात सहभागी आहे. असे म्हणत तिने शोक व्यक्त केला आहे.