महागाईचा झटका!! गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होणार असून पहिल्याच दिवशी जनतेला सरकार कडून झटका बसला आहे. आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हॉटेल मधील जेवण परवडणार नाही.

सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी (OMCs) ने दिलेल्या माहितीनुसार आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 22 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यवसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. मात्र आज घरगुती सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा व्यवसायिकांसाठी मोठा झटका मानला जात आहे.

मुंबईत आजपासून १९ किलोचा सिलिंडर २२०५ रुपयांना मिळेल. दिल्लीत सिलिंडरचा दर २२०३ रुपयांवरून २२५३ रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात सिलिंडरचा दर २०८७ रुपयांवरून २३५१ झाला आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच असून आता व्यावसायिक गॅस मध्ये तब्बल 250 रुपयांनी वाढ झाल्याने जनतेमध्ये नाराजी पसरली आहे.

Leave a Comment