Commonwealth Games : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघ जाहीर ! नीरज चोप्रा करणार संघाचे नेतृत्व

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (Commonwealth Games) भारताचा 37 सदस्यीय ऍथलेटिक्स संघ गुरुवारी अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता याचं नेतृत्व ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा करणार आहे. निवड समितीनं अपेक्षेप्रमाणे खेळाडूंची निवड केली असून एकाही अनपेक्षित नावाला संघात स्थान देण्यात आलेले नाही. AFIच्या निवड समितीने निवडलेल्या 37 सदस्यीय संघात 18 महिला खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये स्टार धावपटू हिमा दास आणि दुती चंद यांचा समावेश आहे.

200 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम धारक अमलान बोरगोहेनला संघात स्थान मिळू शकले नाही. तो AFI द्वारे निर्धारित राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games) पात्रता पातळी गाठण्यात अपयशी ठरला आहे. चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य (Commonwealth Games) चॅम्पियनशिपमध्ये 14.14 मीटरच्या प्रयत्नाने तिहेरी उडीत स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडणारी ऐश्वर्या बाबू हीचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे. सीमा पुनिया या अनुभवी डिस्कस थ्रोअरला तिची मागील कामगिरी लक्षात घेऊन पाचव्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) तिला स्थान देण्यात आले आहे. मात्र, त्यांना अमेरिकेतील स्पर्धेदरम्यान एएफआयने निर्धारित केलेली पात्रता पातळी गाठावी लागणार आहे.

निवड करण्यात आलेले खेळाडू
पुरुष : अविनाश साबळे (3000 मीटर स्टीपलचेस), नितेंदर रावत (मॅरेथॉन), एम श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया (लांब उडी), अब्दुल्ला अबुबकर, प्रवीण चित्रवेल आणि एल्डोस पॉल (ट्रिपलचेस), तेजिंदरपाल सिंग तूर (शॉट थ्रो) ); नीरज चोप्रा, डीपी मनू आणि रोहित यादव (भालाफेक), संदीप कुमार आणि अमित खत्री; अमोज जेकब, नोहा निर्मल टॉम, अरोकिया राजीव, मोहम्मद अजमल, नागनाथन पांडी आणि राजेश रमेश (4×400 मीटर रिले).

महिला : एस धनलक्ष्मी (100 मी आणि 4×100 मीटर रिले), ज्योती याराजी (100 मीटर अडथळा),ऐश्वर्या बी (लांब उडी आणि तिहेरी उडी) आणि अँसी सोजन (लांब उडी), मनप्रीत कौर (शॉट थ्रो), नवजीत कौर धिल्लॉन आणि सीमा अंतिल पुनिया ( डिस्क थ्रो),अन्नू राणी आणि शिल्पा राणी (भालाफेक), मंजू बाला सिंग आणि सरिता रोमित सिंग (वायर शॉट), भावना जाट आणि प्रियांका गोस्वामी, हिमा दास, दुती चंद, श्रावणी नंदा, एमव्ही जिलाना आणि एनएस सिमी (4x100m रिले).

हे पण वाचा :
राजनाथ सिंहांचा उद्धव ठाकरेंना फोन; लवकरच भेट होण्याची शक्यता

अमेरिका पुन्हा हादरलं ! चर्चमध्ये पुन्हा झाला अंधाधुंद गोळीबार

खुशखबर!!! खाद्यतेल झाले स्वस्त; किंमतीत मोठी घसरण

धक्कादायक ! ‘या’ भाजप नेत्याने पत्नीची हत्या करून स्वतःदेखील केली आत्महत्या

63 वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये होणार इतिहासाची पुनरावृत्ती, 1959 नंतर पहिल्यांदाच…..

Leave a Comment