कोल्हापूर, महाबळेश्वरला युवतीवर बलात्कार : युवकांसह आई- वडिलांवर गुन्हा दाखल

Satara Police City
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षांच्या युवतीला धमकी देत कोल्हापूर, महाबळेश्वरला नेऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी एका युवकासह तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सैराज रफिक फरास (वय- 25, रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित युवती 23 वर्षांची असून, संशयिताने तिच्यावर लग्नाचे आमिष दाखवून महाबळेश्वर, कोल्हापूर आणि सातार्‍यात विविध ठिकाणी बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास, तुझ्या भावाला जिवंत मारण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी संशयित आरोपीची आई व भाऊ यांनीही संबंधित युवतीला हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून त्या दोघांवरही पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.