151 धोकादायक अ‍ॅप्सची संपूर्ण लिस्ट, जर यातील एखादेही तुम्ही इन्स्टॉल केले असेल तर लगेच काढून टाका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या धोक्यात आहात. हे गरजेचे नाही कि फक्त चांगले किंवा महागडे स्मार्टफोन वापरणारी लोकच या धोक्यापासून दूर राहतील. तर असे बरेच अ‍ॅप्स आहेत जे नेहमीच आपल्याला टारगेट करतात. त्यांमध्ये आपला खिसा रिकामा करण्याची क्षमता देखील असते. जेव्हा तुम्हाला कोणताही ईमेल मिळतो किंवा एखादा टेक्स्ट मेसेज तुमच्याकडे येतो किंवा तुम्ही एखादे अ‍ॅप डाउनलोड करता तेव्हा त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. कधी कधी धोका असा असतो की, हे अ‍ॅप्स तुमच्या नकळत तुमची फसवणूक करतात. मात्र, Google आणि Apple च्या सर्व प्रयत्नांनंतरही, आपल्याला असे दिसते की काही रिपोर्ट्स असे आले आहेत, जे आम्हाला संभाव्य धोक्याबद्दल चेतावणी देतात.

Avast चा धक्कादायक रिपोर्ट
सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या Avast चा अलीकडील रिपोर्ट लोकांना सावध करत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून UltimaSMS नावाच्या स्कॅमवर काम करत होती. ज्यामध्ये कंपनीला आढळले की, असे 151 अ‍ॅप्स आहेत जे प्रीमियम SMS स्कॅम कॅम्पेनचा भाग आहेत. कंपनीने हे देखील लक्षात घेतले की, हे सर्व अ‍ॅप्स फोटो एडिटर, गेमसाठी कॅमेरा फिल्टर्स किंवा QR Code स्कॅनर इत्यादी उपयुक्त टूल्स म्हणून स्वतःला सादर करतात. युझर्सला महागड्या SMS सर्व्हिससाठी साइन अप करणे हा त्यांचा उद्देश आहे आणि हे सर्व अगदी काही क्षणातच घडते. तुम्हाला समजेपर्यंत तुमचे पैसे संपवले जातात.

तुम्ही UltimaSMS अ‍ॅप इन्स्टॉल केले असल्यास, तुम्ही कोणत्या देशाचे आहात आणि तुमची भाषा कोणती आहे हे शोधण्यासाठी हे अ‍ॅप तुमच्या फोनचे लोकेशन, IMEI आणि फोन नंबर एकाच वेळी वाचते. जेव्हा तुम्ही हे अ‍ॅप उघडाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत स्क्रीनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फोन नंबर किंवा ईमेल पत्ता एंटर करण्यास सांगितले जाईल.

तुम्ही तुमची माहिती सबमिट करताच, ती तुम्हाला प्रीमियम SMS सर्व्हिससाठी साइन अप करेल, ज्याची किंमत दरमहा सुमारे $40 असेल. यापुढे तुम्हाला सबस्क्रिप्शनसाठी बरेच पर्याय दिले जातील नाहीतर हे अ‍ॅप काम करणे थांबवेल. यानंतर, स्कॅन सर्व्हिसद्वारे दर महिन्याला किंवा दर आठवड्याला तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल.

असे अ‍ॅप्स सध्या अनेकांसाठी समस्या बनले आहेत. या अ‍ॅप्समध्ये कोणालाही लुटण्याची क्षमता आहे. जेव्हा तुम्ही कोणतेही अ‍ॅप इंस्टॉल करता तेव्हा तुम्ही तुमच्या फोनची किती काळजी घेता? कदाचित खूप कमी. मात्र तुम्ही या प्रकारच्या अ‍ॅपपासून दूर राहावे.

जाहिराती मोठ्या प्लॅटफॉर्मवर चालतात
अशा घोटाळ्यांचा धंदा किती मोठा आहे, हे या अ‍ॅप्सच्या जाहिराती मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर चालतात, हे यावरून समजू शकते. फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जाहिराती पाहता येतात. जरी मीडिया नेटवर्क असे घोटाळे पकडू शकत नसले तरी आपण कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी निश्चितपणे तपासले पाहिजे.

Google Play Store वरून अ‍ॅप्स काढले
जर तुम्ही विचार करत असाल की, कोणते अ‍ॅप पाहावे आणि कोणते पाहू नये, तर ते टेन्शन फक्त तुमचेच नाही, तर तुमच्यासह हजारो लाखो लोकं या चिंतेने त्रस्त आहेत. येथे आम्ही तुम्हाला काही सर्वात सामान्य बनावट Android अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत ज्यांना लोकं बहुतेक वेळा इंस्टॉल करतात-

 • Ultima Keyboard 3D Pro
 • VideoMixer Editor Pro
 • FX Animate Editor Pro
 • Battery Animation Charge 2021
 • Dynamic HD & 4K Wallpapers
 • RGB Neon HD Keyboard Background
 • AppLock X FREE
 • NewVision Camera
 • Ultra Camera HD
 • Wi-Fi Password Unlock
 • Wi-Fi Around: All Wi-Fi and Hotspots Unlock
 • Colorful Call Screen & Phone Flash
 • Waterdrinker Reminder
 • GT Sports Racing Online
 • Magic Fonts and Keyboard 2021
 • All Language Photo and Voice Translator Al
 • Crime City: Revenge
 • Reface Ultra
 • Projector HD/AR Video Editor
 • LivePhoto Animator
 • Ludo Masterpiece Online
 • Mobile Scanner Pro: PDF Scanner App, Scan to PDF
 • Magic Mix Cut – Super Video Editor
 • Future Scanner FREE 2021
 • Pro Video Downloader 2021
 • Football Masters 2021
 • New Body Shape Editor
 • Call Voice Recording 2.0
 • Pro Tuber Ad Blocker for Video
 • Fitness Ultimate 2021
 • Wallpaper XYZ Pro

जर तुम्हांला संपूर्ण लिस्ट चेक करायची असेल तर इथे क्लिक करा

https://github.com/avast/ioc/blob/master/UltimaSMS/UltimaSMS_IOC_19-10-2021.pdf

Leave a Comment