हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळानंतर लोकं आपल्या आयुष्याविषयी खूपच सजग झाले आहेत. आता अनेक लोकांकडून अप्रिय घटनांपासून सुरक्षित राहण्यासाठी LIC पॉलिसी घेण्याचा कल वाढतो आहे. मात्र असे अनेकदा दिसून येते की, या पॉलिसी लॅप्स होतात आणि लेट फीस आकारले जात असल्यामुळे पॉलिसीधारक ते पुन्हा चालू करत नाहीत. यामुळे आता LIC कडून मुदतपूर्तीपूर्वी बंद झालेल्या जुन्या विमा पॉलिसींना पुन्हा सुरु करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
अशा प्रकारे पुन्हा सुरू करा जुनी पॉलिसी
LIC ने एक ट्विट करत म्हटले की, या मोहिमेअंतर्गत एलआयसी पॉलिसीधारकांना आपली एक्सपायरी झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करता येऊ शकेल. 24 मार्च, 2023 पर्यंत चालू राहणाऱ्या या मोहिमेअंतर्गत लेट फीस मध्ये सवलत दिली जात आहे. अशाप्रकारे, आता एक खास ऑफर देखील दिली जात आहे, ज्यामध्ये लेट फीस फक्त 5 रुपये आहे. नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) आणि बिल पे रजिस्टर्ड पॉलिसींसाठी हे शुल्क आकारले जात आहे.
अशा प्रकारे मिळेल सूट
पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी LIC ने दिलेल्या सवलती तीन विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. यामध्ये, 1 लाख रुपयांपर्यंतचा प्रीमियम मिळवणाऱ्या पॉलिसींमध्ये 25 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे, जी जास्तीत जास्त 2,500 रुपयांपर्यंत असेल.
एक लाखापेक्षा जास्त आणि तीन लाखांपेक्षा कमी प्रीमियम असलेल्या पॉलिसींसाठी 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 3,000 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. तीन लाखांपेक्षा जास्त प्रीमियमवर 30 टक्के सूट आणि 3,500 रुपयांची सूट दिली जात आहे.
जमा झालेला प्रीमियम व्याजासहीत भरून लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा चालू करता येऊ शकते. बंद झालेली पॉलिसी महामंडळाने मंजूर केल्यावरच ती पुन्हा सुरू करता येईल, असेही एलआयसीने म्हटले आहे.
एकूण प्रीमियम प्राप्त विलंब शुल्क सवलत कमाल सवलत मर्यादा (रु. मध्ये)
एक लाखापेक्षा कमी 25% 2,500
एक लाख ते तीन लाख दरम्यान 25% 3,000
तीन लाखाच्या वर 30% 3,500
द्यावे लागतील इतके पैसे
लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी, पॉलिसीधारकाला लेट फीस आणि अतिरिक्त व्याज किंवा दंडासहीत मागील दोन वर्षांच्या प्रीमियमवर नवीन शुल्क भरावे लागेल. मुदतीच्या विमा पॉलिसीच्या बाबतीत, विमा कंपनीकडून पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/
हे पण वाचा :
Bank Account : आपले बंद झालेले खाते पुन्हा सुरु करण्यासाठीचे नियम तपासा
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत नरमाई, पहा आजचे नवे दर
मोबाईल कंपन्या Charger मध्ये जाणूनबुजून छोटी वायर का देतात??? जाणून घ्या यामागील कारण
FD Rates : ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ