रेल्वेचे तिकीट कन्फर्म असूनही त्याला करावा लागला उभा राहून प्रवास… काय कारण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवासाला जायचे म्हणून त्याने राउरकेला इंटरसिटी ट्रेनचे तिकीट कन्फर्म केले होते. पण त्याच्या सीटवर कुणीतरी बसल्यामुळे त्याला संपूर्ण प्रवास उभा राहून करावा लागला. या अभागी प्रवाश्याचे नाव आहे आभासकुमार श्रीवास्तव ! आभास कुमारने ट्विटरवर X आपली व्यथा कथन केली आहे आणि उपरोधिकपणे भारतीय रेल्वे, IRCTC आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. यातून रेल्वेच्या प्रवाश्यांना योग्य सोयी मिळत नसल्याबद्दल सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. आभासकुमारला ट्रेनच्या दारात उभे राहून का करावा लागला प्रवास ?… चला जाणून घेऊया…

राउरकेला इंटरसिटी ट्रेनचे तिकीट 4 दिवस आधी कन्फर्म केलेला आभासकुमार मोठ्या उत्साहाने ट्रेनमध्ये पोहोचला. ट्रेनमध्ये नेहमीसारखीच मोठी गर्दी होती. आभासकुमार श्रीवास्तवने दुसऱ्या सीटर किंवा 2S वर्गात जागा आरक्षित केली होती. ट्रेनच्या डब्यातील प्रवाश्यांच्या गर्दीतून वाट काढत तासाभरात आभासाकुमार आपल्या ६४ नंबरच्या सीटवर पोहोचला. त्याने कन्फर्म केलेल्या सीटवर पोहोचण्यासाठी गर्दीतून मोठ्या मुश्किलीने दिव्य पार पाडले होते. त्याच्या आरक्षित जागेवर पोहोचला… पण तिथे एक व्यक्ती बसली होती. ती व्यक्ती म्हणजे एक गर्भवती महिला… त्यामुळे त्याने उभं राहून प्रवास केला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये, आभास कुमार श्रीवास्तव यांनी त्यांची नाराजी शेअर केली आहे. त्यांच्या आरक्षित जागेवर ते जेव्हा पोहोचले तेव्हा आभासकुमार श्रीवास्तव यांना एक गर्भवती स्त्री त्यांच्या सीटवर बसलेली दिसली. त्या गर्भवती स्त्रीला सीटवरून उठवणे आभासकुमारला योग्य वाटले नसावे. गर्भवती स्त्रीची अवघडलेली अवस्था पाहून तिला सीट रिकामी करण्याची विनंती त्याने न करता दोन तासांचा तो प्रवास ट्रेनच्या दारात उभा राहून केला. परंतु यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आरक्षित जागेवर अथवा तिकीट कन्फर्म नसेल तर अनेक प्रवाशी बिनदिक्कत ट्रेनच्या डब्यात बिनधास्त कसे बसू शकतात ? रेल्वेच्या टीसीचा प्रवाश्यांना धाक वाटत नाही का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

आभासाकुमार श्रीवास्तवने X वरील पोस्टमध्ये काय म्हटलेय ?

यानंतर आभासाकुमार श्रीवास्तव यांनी आपला उभा राहिलेला फोटो ट्विट करत रेल्वे विभागावर निशाणा साधला आहे. “मी 4 दिवसांपूर्वी ट्रेनमधील जागा आरक्षित केली, कन्फर्म तिकीटही मिळाले. ट्रेनमध्ये कसातरी प्रवेश केल्यावर मला समजले की, मी माझ्या सीट क्रमांक 64 पर्यंत पोहोचू शकत नव्हतो. एक तासानंतर जेव्हा मी माझ्या सीटवर पोहोचलो तेव्हा मला माझ्या आरक्षित सीटवर गरोदर महिला बसलेली दिसली. म्हणून मी ट्रेनच्या दरवाजात उभा राहून दोन तास प्रवास केला. एवढा अविस्मरणीय प्रवास आणि मला संपूर्ण उभे राहण्यासाठी कन्फर्म तिकिट दिल्याबद्दल धन्यवाद. असं म्हणत त्यांनी रेल्वे प्रशासनावर
निशाणा साधला.

श्रीवास्तव यांनी पुढे म्हटले आहे की, ‘दुसऱ्या सीटर किंवा 2S वर्गात एक जागा आरक्षित केली. हा सामान्यतः दिवसा इंटरसिटी आणि जनशताब्दी ट्रेनमध्ये आढळणारा नॉन-एसी कोच असतो. तिकीट नसलेल्या प्रवाशांच्या प्रचंड उपस्थितीमुळे, हा अनुभव सामान्य वर्गात प्रवास करण्यासारखाच वाटला.’ विशेष म्हणजे, एका आठवड्यापूर्वी, भारतीय रेल्वेने प्रवास करणार्‍या दुसर्‍या एका प्रवाशाने आरक्षित तिकीट असलेल्यांसाठी नियुक्त केलेल्या डब्यांवर तिकीट नसलेल्या व्यक्तींबद्दल चिंता व्यक्त केली होती. स्वाती राज या प्रवासी महिलेने महानंदा एक्स्प्रेसमधील तिच्या प्रवासातील एक व्हिडिओ पोस्ट केला होता, तिच्या एसी फर्स्ट-टियर कोचच्या कॉरिडॉरमध्ये पुरुष प्रवाशांची गर्दी आहे, असा तो व्हिडीओ होता.