ओबीसी आरक्षणाचा गोंधळ निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच; औरंगाबादेत राज ठाकरे कडाडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक पार पडली. त्यानंतर ते औरंगाबादमधील पत्रकारांशी संवाद साधत होते. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, मी निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणता येणार नाही. निवडणुका येतच राहतात. संभाजी नगरची निवडणूक आणखी वर्षभर पुढे आहे. निदान सहा आठ महिने तरी इथली निवडणूक होणार नाही. त्यासाठीच तर ओबीसीचं प्रकरण सुरु केलंय. केंद्रानं मोजायचे की राज्याचे मोजायचे, यावरून मोजामोजी सुरु झाली आहे. मूळ मुद्द्याला कुणीही सामोरे जायला तयार नाही. त्यांची हिंमतच नाही सामोरे जाण्याची. म्हणून निवडणूका पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही –
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भाजपकडून वारंवार तारखा दिल्या जात आहेत. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तर मार्चमध्येच ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे. परंतु, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही, असं विधान केलं आहे.

Leave a Comment