औरंगाबाद | शहरात रविवारी एमपीएससीची परीक्षा पार पडणार आहे. तत्पूर्वी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. यासाठी शुक्रवारी शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याकरिता बोलावण्यात आले होते. परंतु दोन तास चाचणी घेण्याकरिता कुणीच आले नाही. यामुळे मनपानेच शिक्षकांची परीक्षा घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच शहरात रविवारी विविध केंद्रावर एमपीएससीची परीक्षा पार पडणार आहे. याकरिता पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. यामुळे गुरुवार पासून विविध केंद्रावर शिक्षक कोरोना चाचणी करून घेत आहे. गुरुवारी २१५ शिक्षकांनी चाचणी करून घेतली. शुक्रवारी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व शिक्षकांना सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृह येथे बोलावण्यात आले होते. यानुसार सकाळी ९ वाजताच सुमारे दीड हजार शिक्षक नाट्यगृहात जमा झाले. परंतु सुमारे दोन तास चाचणी घेण्याकरिता कुणीही आले नाही. यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. नंतर मात्र मनपाचे पथक तपासणी करिता दाखल झाले. यामुळे शिक्षकांचा संताप थोडा कमी झाला.
सर्व शिक्षकांना १० वाजता बोलावण्यात आले होते. परंतु ते अगोदर आले. चाचणी साठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी नाट्य गृहात लॉकर नव्हते. यासह आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी रात्री उशिरा पर्यंत काम करतात. इतर ठिकाणी ठेवलेले साहित्य आणण्यास थोडा उशीर झाला.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group