आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं; शिंदे गटाने मांडली भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आम्ही शिवसेनेचेच सदस्य असून आम्ही शिवसेना हायजॅक केलेली नाही तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली आहे अस मत बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी मांडले. आज शिंदे गटाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू मांडली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

आम्ही उद्धव ठाकरेंवर टीका करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला हायजॅक केलं. आमच्या मुळे तुम्ही सत्तेत आलात आणि आम्हांलाच संपवण्याचा प्रयत्न करताय. हे कसं सहन होईल, म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाली अस केसरकर म्हणाले. भाजपसोबत युती करावी अस आम्ही उद्धव ठाकरेंना वारंवार सांगत होतो पण त्यांनी ऐकलं नाही अस दीपक केसरकर म्हणाले.

आम्ही कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला नाही. भाजपचा काहीही संबंध नाही. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन झालेलो नाही. आमचा पक्ष शिवसेनाच आहे. आम्ही शिवसेना सोडल्याच्या चुकीच्या बातम्या सोडल्या जात आहेत.

एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. त्यांना गटनेते पदावरून काढणं योग्य नाही. 50 आमदार असलेल्या नेत्याला 16 आमदार असलेले गटनेते पदावरुन काढू शकत नाहीत. आमच्याकडे 2 तृतीयांश आमदारांची संख्या आहे. या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा केसरकर यांनी दिला.