Karnataka Assembly Result : कर्नाटकात हालचालींना वेग; घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसने उचलले ‘हे’ पाऊल

0
167
karnataka assembly result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Karnataka Assembly Result) कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे सर्व कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर पडला आहे. मात्र एकूण आकडेवारी पाहता आणि जुने काही अनुभव पाहता घोडेबाजार बाजार होऊ नये म्हणून काँग्रेस सावध झाली आहे. निकालाचे कल हाती येत असतानाच काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूत बोलवलं आहे.

काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरू मध्ये का बोलवलं याच नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. परंतु एकूण राजकीय परिस्थिती आणि आकडेवारी पाहता कर्नाटकात घोडेबाजाराला वाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल. तर दुसरीकडे JDS किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील २२४ जागांचे आत्तापर्यंतचे कल पाहिले तर काँग्रेस ११४, भाजप ७८, JDS २६ आणि इतर ६ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असला तरी पक्षाकडून अजूनही सावधगिरी बाळगली जात आहे.

10 मे रोजी कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान झाले होते. त्यानंतर एक्सिट पोल मधेही काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सध्याचे कल पाहता एक्सिट पोल बरोबर ठरला आहे. परंतु आकडेवारी मध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामुळे अंतिम निकाल समोर येईपर्यंत भाजप आणि काँग्रेसची धाकधूक कायम असेल.