हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारला आज 7 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची काँग्रेस पोलखोल करणार असून, मोदी सरकारविरोधात काँग्रेस कडून संपूर्ण राज्यभर निदर्शने चालू आहेत. नाशिक येथे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महसलू मंत्री बाळासाहेभ थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मोदी सरकारवर भाजपवर टीका केली. भाजपनं सत्तेत येण्यासाठी दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, कोरोना स्थितीवरुन थोरात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
पेट्रोलने सेंच्युरी मारली आणि गॅस वाढले आहेत. काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठं लपून बसले आहेत, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला. महागाई वाढल्यानं सर्व सामान्यांच्या खिशातील पैसे गेले. कच्चा तेलाच्या किमती कमी झाल्या तरी आपल्याकडे वाढ सुरू आहे. खाद्य तेल 60 रु लिटर होत ते 200 रु वर गेलं आहे.
भाजपनं दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची आठवण करुन दिली. भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. काळा पैसा भारतात आणणार असं म्हटलं होत, ही आश्वासन पूर्ण झाली नसल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याला 6 महिने झाले आहे. मोदी सरकारनं त्या काळ्या कायद्याविरोधात आंदोलनाची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांची अवहेलना केली गेली, आंदोलन दडपल गेलं. त्यांची समस्या काय आहे पंतप्रधान समजून घेत नाहीत. देश एका माणसाच्या हुकुमावर चालवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.