हंसराज अहिर यांच्या विरोधात काँग्रेसकडून हे तीन उमेदवार शर्यतीत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे

भाजपचा बालेकिल्ला म्हणून विदर्भात ओळख असलेल्या चंद्रपूर मधून हंसराज अहिर सलग चौथ्यांदा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळेस भापजला टक्कर देण्यासाठी काँग्रेससमोर मोठे आवाहन थाटले आहे. अशातच जिल्ह्यात काँग्रेस मध्ये असलेल्या गटबाजीचा फायदा हा भाजपला होत होता त्यामुळे या क्षेत्रात लोकसभेसाठी उमेदवार शोधण्यात काँग्रेसला मोठी अडचण निर्माण होत आहे. अशातच ही गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसने नागपूरच्या विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी घोषित केल्याचे समजताच सोशल मीडियावर असंतोषाचा पाऊस पडायला सुरूवात झाली.

भाजप – शिवसेना युतीमुळे अस्वस्थ झालेले बाळू धानोरकर हे काही दिवसांपासून काँग्रेसच्या वाटेवर होते. काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच काँग्रेसचे काही स्थानिक उमेदवार सुद्धा लोकसभा उमेदवारीसाठी दिल्ली दरबारी आपले ठाण मांडून बसले होते. मात्र या सर्वांना डावलून काँग्रेसने नागपूरच्या विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी देऊन कॉंग्रेच्या विजय रणनिती वर काँग्रेस कडूनच पानी सोडल्याची जनसामान्यांच्या प्रचंड चर्चा आहे. त्यामुळे मुत्तेमवारांच्या उमेदवारीच्या विराधात अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी सुद्धा केल्या आहेत. तसेच काँग्रेस उमेदवारीकरिता जनसामान्यांकडून आ.बाळू धानोरकर यांना जास्त पसंती दर्शविली जात आहे. हे सर्व चित्र बघता काँग्रेस तर्फे चंद्रपूर येथील उमेदवारीला तूर्तास स्थगिती दिली असून स्थानिकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काँग्रेसमधील गटबाजी आली समोर

जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी संपविण्यासाठी कॉंग्रेच्याच काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना पसंती दिली होती व आमदार धानोरकर यांनी सुद्धा लोकसभा लढविण्यासाठी पसंती दर्शविल्याने त्यांचे नाव पक्षश्रेष्टी कडे पाठविण्यात आले होते. काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली असल्याची खमंग चर्चा सोशल मीडियावर बघायला मिळत होती मात्र काही स्थानिक नेत्यांनी दिल्ली दरबारी आपले ठाण मांडून धानोरकरांच्या उमेदवारीला विरोध करत त्याच्या गुन्ह्याची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवून पक्षातील गटबाजी आणखी समोर आणल्याने धानोरकरांची उमेदवारी संपुष्टात आली.

धानोरकरांना अपक्ष लढण्याची मागणी

काँग्रेस कडून उमेदवारी न देता भ्रमनिरास केल्याने आ.धानोरकरांनी लोकसभा अपक्ष लढण्याच्या मागणी धानोरकर समर्थकांकडून जोर धरत आहे. मात्र यापुढील धानोरकरांची भूमिका बघणे औचित्याचे ठरणार आहे.

उमेदवारी करीता फेरविचार

लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीत नसणाऱ्या विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी दिल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट बघायला मिळत होती. त्यामुळे काँग्रेस तर्फे मुत्तेमवार यांच्या उमेदवारीला स्थगिती दिली आहे.

हे आहे उमेदवारीच्या शर्यतीत

माजी खासदार तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुंगलिया हे सुद्धा लोकसभा लढविण्यास इच्छुक असून त्यांच्या सोबतच विधिमंडळ उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा असून वडेट्टीवार लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक नसल्याने त्यांच्या तर्फे बाळू धानोरकर यांचे नाव समोर केले जात आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी मिळणार कुणाला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

लोकसभेत वामनराव चटप ठरणार किंगमेकर

काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांमुळे बाळू धानोरकर यांचा लोकसभेचा पत्ता कट…

अमरावतीतून लढणाऱ्या ‘या’ उमेदवाराच्या प्रचाराला शरद पवार हजेरी लावणार

म्हणून मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर ?

चंद्रपूर शहरातील असली किन्नारांना नकली किन्नरांकडून बेदम मारहाण