१० जनपथवरून होणार सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष बातमी: सत्तास्थापनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात आहे. सध्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ निवास्थानी महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा कि नाही याबाबत सोनिया यांच्या घरी खलबतं सुरु आहेत. अशा वेळी काँग्रेस मधील मोठा गट सत्तास्थापनच्या बाजूने आहे मात्र सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास प्रतिकूल आहेत अशी माहिती समोर येत आहे.

काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगळ्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत गेल्यास त्याचा भविष्यात राजकीय फटका असेल अशी अडचण काँग्रेससमोर आहे. तेव्हा सोनिया यांची भूमिका यासर्वात महत्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, काँग्रेसच्या समर्थयाशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही.

तत्पूर्वी काँग्रेसचे सर्व आमदार सध्या जयपूर येथ आहेत. तसेच बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे असं मत ४४ आमदारांच्या सह्यांचा कागद सोनिया गांधी दिला आहे. तेव्हा सोनिया गांधी ह्या सेनेसोबत जाण्याचा निर्णय देण्याच्या द्विधा मनस्थिती आहेत. कदाचित शिवसेने सोबत न गेल्यास काँग्रेस आमदार फुटण्याची चिंता त्यांना लागून आहे.त्यानुसार सोनिया गांधी म्हणजेच काँग्रेसच्या संमतीशिवाय सरकार स्थापन करता येऊच शकत नाही असे शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सोनिया काय निर्णय घेतात याकडे सर्व लक्ष लागून आहे.

Leave a Comment