सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार का?? नाना पटोलेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik graduate Constituency) निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड आपल्याला पाहायला मिळाली. काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) याना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज न भरता त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष उमेदवार म्हणून भरल्यानंतर आता काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांनी पक्षाला धोका दिला असून बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा (Congress) पाठिंबा नाही असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे पिता- पुत्रांवर निशाणा साधला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, सर्व घडामोडींवर माझं पूर्ण लक्ष आहे. या प्रकरणाबाबत सर्व रिपोर्टींग आम्ही हायकमांड कडे केले आहे. आज रात्रीपर्यंत त्याबाबत आम्हाला काही निर्देश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. परंतु बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही असं म्हणत नाना पटोले यांनी सत्यजित तांबे याना पाठिंबा नाकारला आहे. पक्षाकडून सुधीर तांबे याना तिकीट दिले होते, परंतु त्यांनी फॉर्म न भरता आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज भरून काँग्रेसला धोका दिला आहे अशी टीकाही त्यांनी केली.

सत्यजित तांबे यांनी भाजपला आपण पाठिंबा मागणार असं म्हणणं आणि भाजपने नाशिक पदवीधर मतदारसघात भाजपने उमेदवार न देणं याचा अर्थ हे सगळं ठरलेला कार्यक्रम असला पाहिजे अशी शंकाही नाना पटोले यांनी व्यक्त केली. भाजपचे भय दाखवून घर तोडण्याची कामे आहेत. आज त्यांना याचा आनंद होत आहे पण ज्या दिवशी भाजपचे घर तुटेल तेव्हा त्यांना दुसऱ्याच दुःख काय असत ते कळेल असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला.