उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी प्रियांका गांधींकडून काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश येथे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला. “आम्ही जाहीरानामा सहा विभागात हा जाहीरनामा तयार केला आहे. स्वाभिमान, स्वावलंबन, शिक्षा, सन्मान, सुरक्षा आणि आरोग्य या विभागात जाहीरनामा आहे. राजकारणातील महिलांचं प्रमाण 40 टक्के आहे ते आम्ही 50 टक्केवर नेण्याचा प्रयत्न करु, असे प्रियांका गांधी यांनी यावेळी सांगितले.

उत्तर प्रदेश येथे आज काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसने तयार केला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्या म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षात आम्ही महिला त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. महिला त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत, त्यांच्या पाठिशी उभे राहण्याच्या भूमिकेतून जाहीरनामा जाहीर तयार केला असून तो प्रसिद्ध करत आहेत. आम्ही जाहीरानामा सहा विभागात तयार केला असून स्वाभिमान, स्वावलंबन, शिक्षा, सन्मान, सुरक्षा आणि आरोग्य या विभागात जाहीरनामा आहे. राजकारणातील महिलांचं प्रमाण 40 टक्के आहे ते आम्ही 50 टक्केवर नेण्याचा प्रयत्न करणार आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महिलांच्या उमदेवारीचे प्रमाण वाढेल आहे. नव्या सरकारी धोरणानुसार सरकारी नोकरीत महिलांना 40 टक्के जागा आरक्षित असतील. 20 लाख रोजगार देण्याचे जाहीर केले आहे. त्यातील 8 लाख जागा महिलांसाठी राखीव असतील. 50 लाखापर्यंतची उलाढाल असलेल्या उद्योगांना करातून सूट दिली जाईल, असेही यावेळी प्रियांका गांधी यांनी सांगितले.