Wednesday, March 29, 2023

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच ; अशोक चव्हाणांनी स्पष्ट केली भूमिका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले असून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही यावर भूमिका स्पष्ट करत औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच आहे, असे ठणकावून सांगितले आहे.

ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी काँग्रेसची भूमिका रोखठोकपणे मांडली. औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. तसेच औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे हे लक्षात ठेवा – संजय निरुपम

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. अस संजय निरुपम यांनी म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’