हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडमध्ये खासदार संभाजी राजे यांनी आज राज्य सरकारवर तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती टीकाही केली. यावर चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. “माझ्यावर संभाजीराजेंनी टीका केली. त्यावर मी कोणतीही टीका करणार नाही. मात्र, संभाजीराजेंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, राज्यात आज झालेले आंदोलन हे भाजपप्रणीत होते. हे त्यांना माहिती नसेल ते त्यांनी माहिती करून घ्यावे, असे चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या टिकेबद्दल उत्तर दिले. यावेळी चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. राज्यात मराठा समाजाचे जे आंदोलन होत आहे. त्यामध्ये भाजप प्रणीतही आंदोलने केली जात आहेत. हे संभाजीराजेंना माहिती नसेल तर त्यांनी ते करून घ्यावेत, असा सल्लाही चव्हाण यांनी यावेळी दिला आहे. आंदोलन केले जात आहे.
LIVE: ना. अशोक चव्हाण यांचे निवेदन https://t.co/z3JqIiMDwx
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 20, 2021
चव्हाण म्हणाले की, संसदेत भाजपची असलेली मौन धारण करण्याची असलेली भूमिका आणि संसदेत संभाजीराजेंना बोलू देण्यासाठी विरोधकांकडून करण्यात आलेली मागणी यावर भाजप खासदारांनी काहीही न बोलणे. संसदेतही भाजपकडून आरक्षणाबाबत काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही. हे संभाजीराजेंना माहिती नसेल. संभाजीराजेंचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे हि दुर्देवाची गोष्ट आहे. त्यांची सध्या दिशाभूल करण्याचे काम केले जात असल्याचे यावेळी चव्हाण यांनी म्हंटले आहे.