हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. या वातावरणातही भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. परंतु आता या टीका करत असताना राजकीय नेत्यांनीच खालची पातळी गाठली आहे. गुजरातमधील एका काँग्रेस नेत्याने आपल्या भाषणादरम्यान अतिशय लज्जास्पद वक्तव्य केले आहे. ज्यामुळे आता त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. तसेच, काँग्रेस नेत्यांवर ही जोरदार टीका केली जात आहे.
गुजरातमधील एका सभेत बोलताना काँग्रेस नेते प्रताप दुधात (Pratap Dudhat) यांनी वक्तव्य केले की, “तुमच्या माता, बहिणी आणि मुली या राहुल गांधींसोबत झोपल्या तर तुम्हाला कळेल की ते नपुंसक आहेत की नाही.” प्रताप दुधात यांनी केलेल्या या वक्तव्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आला होता. या व्हिडिओत प्रताप दुधात हे “तुमच्या माता-मुलींना राहुल गांधींसोबत झोपवा, तुम्हाला कळेल की त्या नपुंसक आहेत की नाही” असे वक्तव्य करताना दिसत आहे. यामुळे त्यांना सोशल मीडियावर यूजर्सकडून ट्रोल करण्यात येत आहे.
महत्वाचे म्हणजे, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रताप दुधात यांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत माफी देखील मागितली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेसच्या नेत्यावर या मुद्द्याला धरून जोरदार टीका करत आहेत. सध्या प्रताप दुधात यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद झाला आहे. तर राजकीय नेत्यांसह नेटकरी प्रताप दुधात यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आहेत.
दरम्यान, गुजरातमधील 25 लोकसभा आणि 5 विधानसभेच्या जागांसाठी 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला भाजप नेते भूपत भयानी आणि काँग्रेस नेते प्रताप दुधात यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. यापूर्वी भूपत भयानी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य करताना नपुंसक शब्दाचा वापर केला होता. याच वक्तव्याला प्रत्युत्तर देताना प्रताप दुधात यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले. याच वक्तव्यामुळे आता दुधात वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.