नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या (Ram Temple in Ayodhya) मुहूर्तावरून भारतीय जनता पक्षावर निशाना साधला आहे. दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्ताशी गृह मंत्री अमित शाह यांना झालेल्या कोरोनाचा संबंध जोडला आहे. सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचे उल्लंघन केल्यामुळेच अमित शहा (Home Minister Amit Shah) आणि राम मंदिराच्या पुजाऱ्याला झालेल्या कोरोनाची लागण झाल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत भाष्य केले आहे. हिंदू धर्मातील मान्यतांना न मानल्यामुळेच असे झाल्याचे ते म्हणाले. अशुभ मुहूर्तावर भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राम मंदिराच्या पुजाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे दिग्विजय म्हणाले. सनातन हिंदू धर्माच्या मान्यता डावलल्याचाच हा परिणाम असल्याचे दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे. या मुळे राम मंदिराच्या पुजाऱ्याला करोना झाला, त्यात प्रमाणे उत्तर प्रदेशच्या मंत्री कमलाराणी वरुण यांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाचे उत्तर अध्यक्षही करोनामुळे रुग्णालयात भरती आहेत, असे दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे.
त्रुटि के लिए क्षमा प्रार्थी हूँ। अमित शाह गृहमंत्री हैं ना कि प्रधानमंत्री। क्षमा करें।
— digvijaya singh (@digvijaya_28) August 3, 2020
राम मंदिर भूमिपूजनावर अनेक संतानी उपस्थित केले प्रश्न
अनेक साधूंसह काशीचे ज्योतिष्यांन देखील राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा मुहूर्त अशुभ असल्याचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती(Shankaracharya Swaroopanand Saraswati) यांनी देखील या पूर्वी म्हटले आहे. या पूर्वी त्यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवर राम मंदिराच्या भूमिपूजनाची तिथी, अर्थात ५ ऑगस्ट हा दिवस अशुभ दिवस असल्याचे सांगितले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”