Thursday, March 30, 2023

PM-CARES मध्ये 5 दिवसांत तब्बल ३०७६ कोटी जमा करणाऱ्या ‘त्या’ देणगीदारांची नावं जाहीर करा!- पी. चिंदबरम

- Advertisement -

नवी दिल्ली । माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पीएम केअर फंडात 5 दिवसांत तब्बल ३०७६ कोटी करणाऱ्या देणगीदारांची नावं जाहीर का करण्यात आलेली नाहीत यासंबंधी विचारणा केली आहे. प्रत्येक समाजसेवी संस्था, विश्वस्त मंडळाला देणगीदारांची नावं जाहीर करणं अनिवार्य असताना पीएम केअर फंडाला यामधून मुभा का देण्यात आली आहे ? अशी विचारणा पी चिदंबरम यांनी केली आहे.विश्वस्तांना देणगीदारांची नावं जाहीर करण्यात कसली भीती वाटत आहे ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या पीएम केअर फंडात पाच दिवसांत ३०७६ कोटी रुपये जमा झाले आहेत. केंद्र सरकारकडून ऑडिट रिपोर्टमध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. २७ मार्च रोजी पीएम केअर फंडची सुरुवात करण्यात आली होती. २०२० आर्थिक वर्षासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये २७ मार्च ते ३१ मार्चमधील माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

३०७६ कोटींमधील ३०७५ कोटी ऐच्छिक योगदानातून आले असून ३९ कोची ६७ लाख रुपये परदेशातून मिळालेलं योगदान आहे. रिपोर्टनुसार, पीएम केअर फंडात सुरुवातीला मिळालेला २ लाख २५ हजारांचा निधी होता, तसंच ३५ लाखांचं व्याज जमा झालं. पीएम-केअर फंड वेबसाईटवर ऑडिट रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र यावेळी फंडात योगदान देणाऱ्या स्थानिक तसंच परदेशी देणगीदारांची माहिती सरकारने सार्वजनिक केलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.