हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून काँग्रेसचे जेष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “जर अन्य देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरले तर भारताला का यश मिळालं नाही,” असा सवाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
“भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याला लॉकडाउनच्या रणनितीचा फायदा उठवता येत नाहीये असं दिसतंय. २१ दिवसांमध्ये करोनावर मात करू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु अन्य देश जर यात यशस्वी झाले तर भारत का अयशस्वी झाला हे पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे,” असं चिदंबरम म्हणाले.
विश्व का एकमात्र देश जो लॉकडाउन रणनीति का लाभ नहीं उठा रहा है वह भारत प्रतीत होता है।
पीएम मोदी ने वादा किया था कि हम 21 दिनों में कोरोनोवायरस को हरा देंगे, यह बताना चाहिए कि जब अन्य देश सफल हुए हैं तो भारत क्यों असफल रहा।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 5, 2020
मी भविष्यवाणी केली होती की ३० सप्टेंबरपर्यंत करोनाबाधितांची संख्या ५५ लाखांपर्यंत पोहोचेल. परंतु मी चुकीचा ठरलोय कारण भारत २० सप्टेंबरपर्यंतच त्या संख्येपर्यंत पोहोचेल. सप्टेंबरच्या अखेरिस ही संख्या ६५ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’