मग ‘त्या’ निकषावर नमो अ‍ॅपवर सुद्धा बंदी घाला!’ पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅपवर (namo app) बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारतीयांची माहिती धोक्यात आली म्हणून चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच निकषावर भारतीयांची माहिती गोळा करून परदेशात पाठवणाऱ्या नमो अ‍ॅपवर देखील बंदी घाला, असं त्यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून नमो अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ”१३० कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाइल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅपही बंद केले पाहिजे”, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याचसोबत #BanNaMoApp हा हॅशटॅगही पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्रेंड केला आहे. त्यामुळे खासगी माहितीच्या निकषावर चिनीअ‍ॅप बंद करणारे मोदी सरकार त्याच आधारे नमो अ‍ॅपवरही बंदी घालणार का? याकडे सर्वांच लक्षं लागलं आहे. काँग्रेसच्या या आरोपाला भाजप काय उत्तर देणार? याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

 

दरम्यान, भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. टिकटॉक, हॅलो अ‍ॅप आणि कॅमस्कॅनरसह ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात युट्यूबहून अधिक युजर्स हे टिकटॉक अ‍ॅपचे आहेत. टिकटॉकचे जवळपास २० कोटी युजर्स असल्याचं सांगण्यात येतंय. तर हेलो अ‍ॅपचे भारतात ४० हजार युजर्स आहेत. वुई मेट, शेअर इट, युसी ब्राउजर्स, क्लब फॅट्री, युसी न्यूज, झेंडर, लाइक, सीएम ब्राउजर्स, शीन, न्यूजडॉग, वंडर कॅमेरा, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर-चिता मोबाइल, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, स्वीट सेल्फी, हेलो, यू व्हिडिओ, मोबाइल लेजंड्स अशा एकूण ५९ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.” 

Leave a Comment