विलासकाकांच्या जाण्याने राजकारणातील एका युगाचा अंत- पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर काका यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनावर सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव पाटील उंडाळकर याच्या आठवणींना उजाळा देत दुःख व्यक्त केलंय. विलास काकांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाल्याची भावना चव्हाण यांनी व्यक्त केली. आताच राजकारण बदलत आहे. निवडणुकांच्या पद्धती बदलत आहेत. अशा वेळी विलास काकांसारखं सेवाभावी व्यक्तिमत्व तयार होणे अवघड आहे. सेवाभाव ठेऊन जनतेसाठी काम करणाऱ्या माणसांना नेहमी जनता डोक्यावर घेते, विलास काका त्याचे उत्तम उदाहरण आहेत. अशी भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

आमिषांना बळी न पडता काँग्रेसची विचारधारा सोडली नाही
चव्हाण पुढे म्हणाले कि, ”विलासकाकांनी कधीही काँग्रेसचा विचार सोडला नाही. विचारधारेशी ते प्रामाणिक राहिले. कधीही ते जातीयवादी विचारधारेकडे झुकले नाही. इतक्या वर्षात त्यांना अनेक आमिष दिली गेली मात्र, अखेरपर्यंत ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले.”

चव्हाण-विलासकाका मनोमिलन

दरम्यान, ३ महिन्यापूर्वी जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस बळकट करण्यासाठी सर्व मतभेदांना तिलांजली देत विलासराव पाटील उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे जिल्ह्यातील दोन्ही नेते एकत्र आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक लढवत असतानाच विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. दरम्यान काकांच्या जाण्याने कराड दक्षिण मतदारसंघाने एक हक्काचा माणूस गमावला असल्याची सल सामान्यांच्या मनात आहे.

विलासकाकांच्या जाण्याने राजकारणातील एका युगाचा अंत-  Prithviraj Chavan | Vilasrao Patil Undalkar

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment