कोल्हापूर । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांवर आज जोरदार शब्दांत टीकास्त्र सोडले. हे सगळं अंबानी आणि अदानी या आपल्या भांडवलदार मित्रांसाठी चाललं आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र व्हर्च्युअल सभेत चव्हाण बोलत होते. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीत हा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ; आता 'इतकी' झाली संपत्ती
वाचा सविस्तर -👉 https://t.co/g1g6k8J8dv@PMOIndia @narendramodi— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 15, 2020
केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर चौफेर टीका करताना चव्हाण म्हणाले, अनेक वर्षांत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हिताची कृषी यंत्रणा उभी केली होती. ती ६ वर्षांत मोदी सरकारने मोडित काढली. शेतकऱ्यांच्या विरोधात काळा कायदा मंजूर केला. सर्व बाबतीत या सरकारला अपयश आले आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशावेळी अंबानी आणि अदानी या भांडवलदार मित्रांना कृषीव्यवस्थाच बहाल करण्याचा मोदींचा डाव आहे.
जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतचं आरक्षण लागू राहिले पाहिजे'; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठं विधान
वाचा सविस्तर -👉 https://t.co/L1zRwJniK6@RSSorg #mohanbhagwat #Reservation #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 15, 2020
हमीभाव दुप्पट करतो, सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो, अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या. पण प्रत्यक्षात काय केले हे ते सांगत नाहीत. उलट हमीभाव देता येत नाही असे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. साठाबंदी उठवून काळाबाजाराला सूट दिली, बाजार समितीची यंत्रणा मोडित काढण्याचा त्यांचा डाव आहे. हा काळा कायदा फेटाळून लावण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, तळागाळातील शेतकऱ्यांनी याविरोधात उठाव करावा असेही ते म्हणाले.
बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा
वाचा सविस्तर -👉 https://t.co/ZCpeBq0nTF@CMOMaharashtra @akshaykumar @ajaydevgn @BeingSalmanKhan @amirkingkhan #ShahRukhKhan #BollywoodStrikesBack #Bollywood— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”