‘या’ भावुक शब्दांत राहुल गांधींनी वाहिली वडील राजीव गांधींना श्रद्धांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज २९ वी पुण्यतिथी. या दिवशी आपले वडील राजीव गांधी स्मरण करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भावुक होत श्रद्धांजली अर्पण केली. आपण खऱ्या देशभक्ताचे पुत्र असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.एका ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

”माझे वडील खरे देशभक्त, उदारमतवादी आणि परोपकारी होतो. अशा वडिलांचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान असताना त्यांनी देशाला विकासाच्या दिशेने नेले. त्यांच्या दूरदृष्टीने त्यांनी महत्त्वाची पावले उचलत देशाचे सक्षमीकरण केले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना प्रेम आणि कृतज्ञतेने अभिवादन करतो,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राजीव गांधी भारताचे आतापर्यंतचे सर्वात युवा पंतप्रधान
राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी झाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी १९८४ मध्ये काँग्रेस पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वयाच्या ४० व्या वर्षी ते भारताचे सर्वात लहान वयातील पंतप्रधान बनले. दरम्यान, १९९१ सालच्या लोकसभा निवडूक प्रचारावेळी त्यांची एका आत्मघाती हल्लात हत्या करण्यात आली होती. २१ मे १९९१ रोजी त्यांची तामिळनाडूतील श्रीपेरुंबुद्दूर येथे एका निवडणुकीच्या सभेत पोहोचताच एलटीटीई या श्रीलंकन दहशतवादी संघटनेने मानवी बॉम्बच्या सहाय्यानं राजीव गांधी यांच्यावर आत्मघाती हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली होती.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment