सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीचे निकाल हाती आले असून यामध्ये खटाव सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे हे विजयी झाले आहेत. घार्गे यांची या निवडणुकीतील प्रचाराची धुरा सांभाळणारे कॉंग्रेसचे नेते रनजितसिंह देशमुख यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त केले असून प्रभारकर घार्गे यांना खोट्या केसमध्ये अडकवून राजकरण करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप केला.
प्रभारकर घार्गे यांना खोट्या केसमध्ये अडकवून राजकरण करण्याचा प्रयत्न झाला, त्यांना जेलमध्ये ठेऊन निवडणूकी पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र मतदारांनी तो उधळून लावला असे रणजित सिंह देशमुख यांनी सांगितले. तसेच जिल्हा बॅंकेत कॉंग्रेसला प्रतिनिधित्व मिळाले नाही. याबाबत विचारले असता कॉंग्रेस आणि शिवसेनेला जिल्हा बॅंकेत बरोबर घेतले नाही. याचा परिणाम भविष्यातील जिल्ह्यातील राजकारनावरती होणार असल्याचे सांगितले.
जिल्हा बँकेची निवडणूक ही सहकाराची निवडणूक असते. यामध्ये पक्ष वगैरे काही नसतं, पण महाराष्ट्रामध्ये जो पायंडा आहे की सर्वाना बरोबर घेऊन जायचं, पण याठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेला बरोबर घेतले गेले नाही. निश्चितच याचा परिणाम भविष्यातील राजकारणावर होईल असा इशारा रणजीतसिंह देशमुख यांनी राष्ट्रवादीला दिला.