…तेव्हा फडणवीस गृहमंत्री असताना करण जोहरची चौकशी का केली नाही? – काँग्रेसचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स पाठवलं आहे. यानंतर आता काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. करण जोहरच्या घरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता. त्यावेळी फडणवीस सरकार होते, मग त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला का वाटले नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, “राष्ट्रीय तपास यंत्रणा या भारतीय जनता पार्टी सरकारच्या हातच्या बाहुल्या झाल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर त्या नाचत आहेत हे वारंवार स्पष्ट होत आहे. एनसीबी, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या राष्ट्रीय तपास यंत्रणा सिलेक्टिव्ह चौकशी करताना दिसत आहेत. एका पार्टीच्या व्हिडीओवरून करण जोहरची चौकशी होऊ शकते, तर मग कंगणाच्या चौकशीची हिम्मत एनसीबी का दाखवत नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात एनसीबीचा काय स्वार्थ असावा. करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 चा आहे. त्यावेळी गृहमंत्री फडणवीस होते. त्यांनी यावर खुलासा करावा

सचिन सावंत यांनी यामागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “ड्रगच्या चौकशीच्या नावाखाली बॉलिवूडला, महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याची पद्धतशीर मोहिम राबविली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये बॉलिवूड घेऊन जाण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी फिल्मसीटी उभी करण्याची घोषणा केली. त्यानंतर अशा कारवाया करुन बॉलिवूडवर दबाव टाकण्याचे प्रकार होत आहेत.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment