हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध राजकारणी आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे क्रिकेट प्रेम सर्वांनाच माहीत आहे. वारंवार सोशल मीडिया चर्चेत असलेल्या थरूर यांनी थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. थरूर यांच्या म्हणण्यानुसार, 90च्या काळात सचिनपेक्षा संघाकडे चांगला पर्याय नव्हता, परंतु त्याच्या नेतृत्व कौशल्याने कधीच प्रभावित केले नाही.
“सचिनकडे त्यावेळी मजबूत संघ नव्हता आणि त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं होतं, त्यामुळे तो कर्णधारपदी अपयशी ठरला. अशा प्रकारे तो स्वतः कबूल करेल की सर्वात प्रेरणादायक, कर्णधार तो नव्हता. शेवटी त्याने आनंदाने कर्णधारपद सोडले,” असेही थरुर यांनी सांगितले.
सचिन तेंडुलकर हा नेहमीच क्रिकेटपटूंसाठी आदर्श होता, त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत. सचिनने सर्व गोष्टी साध्य केल्या, जे एक फलंदाज स्वप्नं म्हणून पाहत असतो. परंतु कर्णधार म्हणून तो यशस्वी होऊ शकला नाही.
1996 मध्ये भारतीय संघाची नेतृत्वाची धुरा हाती घेतलेल्या तेंडुलकरने 73 वनडे सामन्यांपैकी केवळ 23 सामने जिंकले. 43 सामने पराभूत झाले. त्याच्या विजयाची टक्केवारी फक्त 35.07 आहे. कसोटीमध्ये ही तर ही आकडेवारी अधिकच खराब होती. 25 पैकी केवळ चार सामने जिंकले. नऊ सामन्यात दारुण पराभव झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’