हाथरस प्रकरण: अखेर राहुल-प्रियांका गांधींना पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याची मिळली परवानगी

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरस येथील पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वी हाथरस प्रकरणातील पीडित तरूणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यावेळी रोखण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे अनेक खासदार आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते. परंतु आता प्रशानानं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे.

डीएनडीवर पोहोचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नियमांचे आणि कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची माहिती नोएडाचे पोलिस सहआयुक्त रणवीर सिंह यांनी दिली. तर दुसरीकडे काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घराभोवती मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दिल्ली नोएडा डायरेक्टवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात घोषणा देत होते. यामुळे डीएनडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. या मुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

‘मुख्यमंत्री आदित्यनाथ डरपोक आहेत’
दरम्यान, काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी हाथरस प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. योगी आदित्यनाथ हे डरपोक असून ते आता लपून बसले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार डरपोक आहे, मात्र भारतीय जनता पक्षाचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाही, असे सुरजेवाला म्हणाले. राहुल गांधी हे एकटेच हाथरसला जाऊ इच्छित होते. मात्र त्यांना जाऊ दिले गेले नाही, त्यांना धक्काबुक्की करून जमिनीवर पाडण्यात आले. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगत जे अनाचार करत आहेत, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करणे चुकीचे आहे का, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

हा काँग्रेस विरुद्ध भाजप असा विषय नाही
हा काँग्रेस विरुद्ध भाजप असा विषय नाही. हा विषय आहे पीडित कुटुंबाला न्याय देण्याबाबतचा. पीडित कुटुंबावर दबाव टाकला जात आहे, असे म्हणत मिडियाला प्रवेशापासून का रोखले गेले. राहुल गांधी जर एकटे जाऊ इच्छित होते तर त्यांना का जाऊ दिले नाही, असे प्रश्न विचारत रणदीप सुरजेवाला यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर संशय व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like