विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ मंत्र्याची लागू शकते वर्णी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची नियुक्ती झाल्यानंतर आता राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी (K C Padvi) यांचे नावही आघाडीवर आहे. के.सी.पाडवी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेतील कामकाजाचा चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे के.सी.पाडवी यांचं नाव काँग्रेसकडून सुचवलं जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

के.सी पाडवी यांना याबाबत विचारण्यात आलं असता राजकारणात अशा प्रकारच्या चर्चा होत असतात, असं वक्तव्य केलं आहे. नंदूरबारच्या धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात विविध विकास कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.”विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा आहे. पण या चर्चेआधी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीही माझ्या नावाची चर्चा होती. त्यामुळे राजकारणात अशा चर्चा होतच असतात. पण अशा परिस्थितीत आपण न थांबता पक्षासाठी काम करत राहणं महत्वाचं आहे. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणं हे माझं काम आहे”, असं के.सी.पाडवी म्हणाले.

कोण आहेत के.सी.पाडवी?
राज्यातील पहिला क्रमांचा मतदारसंघ म्हणजेच अक्कलकुवा अक्राणी मतदार संघ. या मतदार संघाचे १९९५ सालापासून आमदार के.सी.पाडवी प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजपने अनेकदा या मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलेलं नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये के.सी. पाडवी यांच्याकडे सध्या आदिवासी विकास विभागाची जबाबदारी आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment