मुंबई । एका पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
“न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. पण मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.
“राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आणि यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. “वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील आणि त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
काय आहे प्रकरण?
यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.
प्रेमाला नकार दिल्याने देहव्यापार करणाऱ्या तरुणीच्या गुप्तांगास इजा पोहोचवून गळा आवळून हत्या
वाचा सविस्तर -👉 https://t.co/K0FSXoArx5#CrimesAgainstHumanity #crime #CrimeFamily #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 17, 2020
'यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार'; 'ऑनलाईन' मेळाव्याच्या चर्चेला संजय राऊतांचा फुलस्टॉप
वाचा सविस्तर -👉 https://t.co/BnkvHHu4G5@CMOMaharashtra @OfficeofUT @rautsanjay61 @ShivSena #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 17, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”