जेंव्हा बलात्कार टाळता येण्याजोगा नसतो, तेंव्हा झोपा आणि…; भर विधानसभेतच ‘या’ काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राजकीय नेत्यांमध्ये वादग्रस्त विधाने करण्याचे प्रमाण चांगलेच वाढल्याचे दिसते. अनेकजण अगोदर वादग्रस्त विधाने करतात आणि नंतर मग जाहीरपणे माफीही मागतात. मात्र, त्यामुळे त्यांची समाजामध्ये प्रतिमा खराब होतेच. असेच एक वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आले आहे. ते म्हणजे कर्नाटक विधानसभेचे माजी स्पीकर आणि वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश कुमार यांनी चक्क विधान विधानसभेमध्येच एक वादग्रस्त केले आहे. ‘जेंव्हा बलात्कार टाळता येण्याजोगा नसतो, तेंव्हा झोपा आणि त्याची मजा घ्या’ असे त्यांनी म्हंटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना वरिष्ठ काँग्रेस नेते के आर रमेश कुमार यांनी स्पीकरच्या खुर्चीवर बसलेल्या विश्वेश्वर हेगडे यांच्याकडे बोलण्यासाठी वेळ मागीतली. यावेळी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी प्रत्येकाला वेळ दिल्यास अधिवेशन कसं चालवायचं असा प्रश्न केला. सदस्यांनी स्वतःहून निर्णय घ्या असं सांगून त्यांनी माजी सभापती केआर रमेश कुमार यांच्याकडे पाहिले. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले.

या विधानानंतर ते म्हणाले की, “मला वाटतं की आपण परिस्थितीचा आनंद घेऊ या, मी हे नियंत्रणात ठेवू शकत नाही आणि योग्य कारवाईप्रमाणे पुढे जाऊ शकत नाही.” त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीला विरोध करण्याऐवजी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेतील सदस्यांमध्ये हशा पिकला. केआर रमेश कुमार यांनी यापूर्वीही अशा प्रकारची अनेकवेळा वक्तव्ये केली आहेत.

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष असताना कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. यावर कोर्टात हे प्रकरण गेले असता कोर्टात उलटतपासणी घेतल्यावर जसा बलात्कार पीडितेवर पुन्हा पुन्हा बलात्कार होत असल्याचा असंवेदनशील विनोद करत ते म्हणाले होते. नंतर जेव्हा महिला आमदारांनी या असंवेदनशील विधानाचा निषेध केला होता, तेव्हा कुमार यांनी माफी मागितली होती.

Leave a Comment