हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आसाम आणि मिझोरामच्या सीमावरील काही भागांत हिंसाचाराची घटना घडली. या दरम्यान आसाम पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक व गोळीबारही झाला. त्या घटनेत महाराष्ट्रातील मुळचे पुण्याचे असलेले पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर हे जखमी झाले आहेत. या घटनेवरून राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ट्विट करून थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. “या घटनेला शहा जबाबदार असून त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “आसाम-मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलीसांनी काल एकामेकांवर गोळीबार केला आणि ५ पोलीस शहीद झाले. या चकमकीत कच्छरचे पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर (मूळ पुण्याचे) हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत. ते आणि इतर पोलिस लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. आसाम-मिझोराम सीमेवरील या परिस्थितीला फक्त गृहमंत्री अमितशहा व आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा जबाबदार आहेत. प्रधानमंत्र्यांनी ताबडतोब बैठक बोलवली पाहीजे आणि ईशान्येकडील राज्यात शांतता प्रस्थापित केली पाहिजे,” असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
आसाम-मिझोराम सीमेवरील या परिस्थितीला फक्त गृहमंत्री #अमितशहा व आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा जबाबदार आहेत. प्रधानमंत्र्यांनी ताबडतोब #InterstateCouncil ची बैठक बोलवली पाहीजे आणि ईशान्येकडील राज्यात शांतता प्रस्थापित केली पाहिजे. #Assam #AssamMizoramBorder
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 27, 2021
यावेळी आमदार चव्हाण यांनी ट्विट करीत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेची जबाबदारी स्विकारुन तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आमदार चव्हाण यांनी आपल्या ट्विटमधून आसाम आणि मिझोरामच्या सीमावर्ती भागात होत असलेल्या संघर्षाबाबत माहिती दिली आहे.