संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; नाना पटोलेंचा टोला

raut and nana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी या तीन पक्षांमध्ये धुसफुस असल्यानं अनेकदा समोर येत आहे. विशेषत: काँग्रेसची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रती असलेली प्रचंड नाराजी अनेकदा दिसून आली आहे. त्यातच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना देखील वाचत नाही असे नाना पटोले यांनी म्हंटल.

संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना वाचणं आम्ही बंद केलं. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, याची माहिती कदाचित राऊत यांना नसावी, अशी खोचक टीका पटोले यांनी केली.

दरम्यान यावेळी नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. भाजपला 24 तास फक्त सत्ता पाहिजे, देशात कोरोनाच्या चितेमध्ये लोक जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारात लागले होते, अशी टाकी नाना पटोले यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.