हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. राम मंदीराच्या देणगीसाठी भाजपकडून देशभर पैसे गोळा केले जात आहेत. श्रीरामाने यांना हे टोलवसुलीचे कंत्रात दिलं आहे का ? असा सवाल नाना पटोले यांनी विचारताच सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी झाली.
नाना पटोले नक्की काय म्हणाले-
माझ्याकडे मनोहर कुलकर्णी नावाची एक व्यक्ती आली होती. यावेळी त्याने भगवान श्रीरामाच्या नावे मंदिरासाठी पैसे मागितले जात असून मी दिले नाही तर धमकावलं जात असल्याचं सांगितलं. अशा कोणत्या निधी कायद्यांतर्गंत हे पैसे गोळा करत आहेत. रामाने यांना टोलवसुलीचं कंत्राट दिलं आहे का? याचं उत्तर पाहिजे. रामाच्या नावाने पैसा गोळा करणारे हे कोण?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केला.
दरम्यान यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. ज्यांना खंडणी गोळा करण्याची सवय आहे त्यांना समर्पण कळणार नाही. असेल हिंमत तर चर्चा लावा काही अडचण नाही अशा शब्दांत फडणवीसांनी आपला संताप व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’