आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? नाना पटोलेंचा शिवसेनेवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वबळावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून काँग्रेसचे कान टोचले होते. एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे’ असा टोला शिवसेनेने लगवल्या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे.

नाना पटोले म्हणाले, स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नाही.’ असं चोख प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलं आहे.

कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन काम केलंय. रक्तदान, ऑक्सिजन पुरवठा, मास्क वाटप, प्लाझ्मा दान अशी अनेक कामं काँग्रेसनं केली आहेत असे म्हणत कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नाही अस नाना पटोले यांनी म्हंटल.