आम्ही भाजपा नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही ; नाना पटोलेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा उल्लेख पप्पु असा केला होता. नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत अस चंद्रकांत पाटील यांनी म्हणल्यानंतर आता नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील काहीही बोलले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबूजा म्हणणार नाही असा टोला त्यांनी लगावला.

नाना पटोले म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी. त्यांनी आमच्यावर केलेल्या टीकेमुळे पेट्रोल, डिझेल व जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असेल. मोदी सरकारने आणलेले तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील. केंद्र सरकारने जाणिवपूर्वक कोर्टाच्या माध्यमातून रद्द केलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळणार असेल तर चंद्रकांत पाटलांच्या टीकेचे स्वागतच आहे.” असं देखील नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते –

नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

Leave a Comment