हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत झाली. १७ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. सोनिया गांशी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही मोठ्या उत्साहाने मतदान प्रक्रियेत भाग घेतला होता. या निवडणुकीत ९६ टक्के मतदान झाले आहे. एकूण 9,900 पैकी 9,500 प्रतिनिधींनी मतदान केलं होत.
काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत गांधी घराण्यातील एकही सदस्याने भाग घेतला नाही त्यामुळे तब्बल २४ वर्षानंतर बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष काँग्रेसला मिळणार आहे. यापूर्वी काँग्रेस अध्यक्षपदासाठी शेवटची निवडणूक 2000 मध्ये पार पडली होती. सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यामध्ये झालेल्या या लढतीमध्ये सोनिया गांधी यांनी प्रसाद यांचा दारुण पराभव केला होता.