हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात आहे. १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची कारवाईवर महत्वाची सुनावणी आहे, याच संदर्भात काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत,असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे . ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यात जी तरतूद करण्यात आली, त्याचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार निलंबनाला पात्र आहेत, असं विधान चव्हाण यांनी केल आहे. किमान दोन तृतीयांश सदस्यांनी कुठल्यातरी पक्षात विलीन झाले पाहिजे, अशी राज्यघटनेत तरतूद आहे. पण असं झालेलं नाही. त्यानंतर आता त्यांना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असा तर्क दिला जात आहे. पण आता ही घटना घडून गेली आहे.
अध्यक्षांनी ज्या नेत्याला गटनेता म्हणून मान्यता दिली आहे किंवा प्रतोद म्हणून मान्यता दिलीय. त्यांचा आदेश मोडलेला आहे. त्यामुळे व्हीप मोडला आहे, त्यात काही शंका नाही. राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यात जी तरतूद करण्यात आलीय, त्याचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळं शिंदे गटातील आमदार निलंबनाला पात्र आहेत, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.