मोटेरा स्टेडियमला मोदींचे नाव दिल्यानंतर राहुल गांधींनी केली सडकून टीका, म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. दरम्यान सरदार पटेल यांचं नाव असलेल्या या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आल्यानंतर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही या मोटेरा स्टेडियमच्या नामकरणावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

खरं किती चांगल्या प्रकारे बाहेर येते, नरेंद्र मोदी स्टेडियम, अडानी अँड, रिलायन्स अँड, जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली, असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ज्या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले, त्या स्टेडियमला आधी सरदार पटेलांचे नाव देण्यात आले होते. मात्र, आता या स्टेडियमचे नाव पंतप्रधानांच्या नावाने, नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. यामुळेच काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधानांना निशाण्याव घेतले आहे.

स्टेडियमला पंतप्रधान मोदी यांचं नाव देणं म्हणजे सरदार पटेल यांचा घोर अपमान असल्याचं काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलंय. मोटेरा स्टेडियमवरुन सरदार पटेल यांचं नाव हटवून नरेंद मोदी यांचं नाव देणं हा स्वातंत्र्याच्या महानायकाचा घोर अपमान आहे, असं ट्वीट श्रीनेत यांनी केलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोदींवर कडक शब्दांत टीका केली होती. स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावानी मतं मागून थकल्यानंतर त्यांच्या नावानी उभे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतलं, हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असं म्हणत आव्हाडांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

Leave a Comment