महागाई म्हणजे मोदी सरकारची टॅक्स वसुली; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई झपाट्याने वाढत आहे. एकीकडे कोरोना संकट आले असताना दुसरीकडे महागाईत देखील वाढ होत असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की , सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकऱ्यांना होत आहे का? नाही! कारण, ही महंगाई म्हणजे खरे तर मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली आहे.

दरम्यान, देशात गॅस, पेट्रोल, डिझेल वाढीमुळे जनता आधीच त्रस्त आहे. त्यात कोरोना संकट अजून गेलेलं नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार वर टीका करत असतात. देशात पेगॅसस प्रकरणावरून राजकारण तापलं असून पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचे राहुल गांधी यांनी यापूर्वी म्हंटल होत.