हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार वर सातत्याने टीका केली जात आहे. एलपीजी गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यातच पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की , महंगाई का विकास जारी, अच्छे दिन देश पे भारी, पीएम की बस मित्रों को जवाबदारी’ . गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये #PNG #CNGPriceHike हा हॅशटॅगही वापरला आहे.
महँगाई का विकास जारी,
‘अच्छे दिन’ देश पे भारी,
PM की बस मित्रों को जवाबदारी!#PNG #CNGPriceHike— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 9, 2021
८ जुलैपासून CNG आणि PNGची नवीन किंमत
CNG
दिल्ली – ४४.३० रुपये प्रति किलोग्रॅम
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद – ४९.९८ रुपये प्रति किलोग्रॅम
गुरुग्राम – ५३.४० रुपये प्रति किलोग्रॅम
रेवाडी – ५४.१० रुपये प्रति किलोग्रॅम
करनाल – ५१.३८ रुपये प्रति किलोग्रॅम
कैथल – ५१.३८ रुपये प्रति किलोग्रॅम
कानपूर,हमीरपूर आणि फतेहपूर – ६०.५० रुपये प्रति किलोग्रॅम
PNG
दिल्ली – २९.६६ रुपये प्रति एससीएम
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद – २९.६१ रुपये प्रति एससीएम
करनाल आणि रेवाडी – २८.४६ रुपये प्रति एससीएम
मुजफ्परनगर, मेरठ आणि शामली – ३२.६७ रुपये प्रति एससीएम