राजीव गांधी देशाचे हिरो, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे स्थान हलणार नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

0
35
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतल्यानंतर काँग्रेसकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरून नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार २००२ पासून आधी आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे असे ट्विट सचिन सावंत यांनी केले.

शहीद राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र व हिरो होते. त्यामुळे मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही. स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता आहे.

तरीही जर खेळाडूंचे नाव देण्याची तात्विक भूमिका असेल तर मोदी व जेटली यांच्या नाव ज्या स्टेडियमना दिले आहे ते बदलून दिग्गज खेळाडूंचे नाव देण्याची सुरुवात करा. सरदार पटेलांचे नाव छोटं करुन हयातीतच स्वतःचे नाव स्टेडियमला देणारे मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा असे सचिन सावंत यांनी म्हंटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here