औरंगाबाद | महिला काँग्रेसच्या वतीने आज गांधी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पक्षाच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी मराठवाड्यात हो मोठ्या प्रमाणावर होत असलेले बालविवाह रोखण्यासाठी हेल्पलाइन सुरू करणार असल्याची माहिती दिली.
येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी देण्यात येणार आहे. पन्नास टक्के महिलांना तिकीट देण्यात येतील असेही त्या म्हणाल्या. आगामी काळात महिला संघटन मजबूत करण्यात येणार आहे. संघटनेतील महिलांना स्वयम रोजगार अंतर्गत लघुउद्योगासारखी कामे देण्यात येणार असल्याची माहिती सव्वालाखे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस अध्यक्ष काँग्रेस रवी काळे, कल्याण काळे, सरोजा मसलगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.