सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 621 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात सर्वात उंच्चाकी 2 हजार 502 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 24 हजार 56 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 25 हजार 472 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 हजार 92 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2917 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोमुक्तीचा व बाधितांचा आकडा जवळपास समसमान असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दिवसभरात 1 हजार 621 रूग्ण बरे होवून घरी गेले, जिल्ह्याला दिलासादायक बातमी आहे. तर सोमवारी रात्री नव्याने केवळ 2 हजार 502 बांधितांच्यामुळे जिल्ह्यातील सर्वात रेकाॅर्डब्रेक आकडे थांबले नसल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. तर रविवारी दिवसभरात 30 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba