Monday, January 30, 2023

बॉलिवूड दबंगच्या लाडक्या बहिणींना झाली होती कोरोनाची लागण

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण झाली आहे. बहिण अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता शर्मा दोघीही कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. ही माहिती खुद्द सलमाननेच दिली आहे. सलमान खानचा राधे चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान सलमान खानने कोरोनाच्या परिस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, आधी लांबच्या लोकांना कोरोना झाल्याची बातमी कानावर येत होती. मागील वर्षी माझ्या ड्रायव्हरलासुद्धा कोरोना झाला होता. तो पुढे बोलताना म्हणाला कि, कोरोनाची दुसरी लाट खूपच भयानक आहे आणि कोरोना आता घरात घुसला आहे.

- Advertisement -

एका मुलाखतीत सलमान खानला विचारले होते की, लोक कोरोनाच्या बाबतीत काळजी घेताना दिसत नाही. त्यांना काय सांगशील. त्यावर सलमान खानने त्याच्या बहिणींबद्दल सांगितले. सलमान खानने सांगितले की त्याच्या दोन्ही बहिणी अलवीरा आणि अर्पिता यावेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.

सलमानच्या या मुलाखतीनंतर त्याची बहीण अर्पिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं. ‘एपिल महिन्याच्या सुरुवातीला मला कोरोनाची लागण झाली होती. पण मला कोणतीच लक्षणे नव्हती. मी सर्व नियमांचं पालन केलं आणि देवाच्या कृपेने त्यातून बरी झाली. तुम्हीसुद्धा सुरक्षित राहा आणि काळजी घ्या’, अशी पोस्ट अर्पिताने लिहिली.सलमान खानची बहिण कॉश्च्युम डिझायनर असलेली ५१ वर्षीय अलवीराने अभिनेता अतुल अग्निहोत्री याच्याशी १९९६ साली लग्न केले होते. तर ३१ वर्षीय अर्पिता खानने २०१४ साली आयुष शर्मासोबत लग्न केले.

सलमानचा ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट या आठवड्यात १३ तारखेला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान सोबत, रणदीप हुडा, आणि दिशा पटनी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाविषयी सध्या सलमानचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षभरापासून बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. तसेच हा चित्रपट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांसाठी विशेष करून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.